¡Sorpréndeme!

Palghar MNS : पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर  Avinash Jadhav यांच्या फोटोला काळं फासलं

2025-03-30 1 Dailymotion

पालघरमध्ये मनसेमध्ये अंतर्गत वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. कारण मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आले आहे. पालघरच्या बोईसरमधील ओसवाल परिसरामध्ये लागलेल्या बॅनरवर हा फोटो काळा केलेला आहे. पालघरमधील मनसेचे पदाधिकाऱ्यांनी हे काळं फासल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळे पालघरमध्ये मनसेमधली अंतर्गत धुसफुस जी आहे ती आता बाहेर आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष पाटील रवाना होतायत. मात्र इथे कुठेतरी या बॅनरवरती काळ फासलं गेलेलं अविनाश जाधव याचा अर्थ असा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये कुठेतरी अविनाश जाधव यांना कुठेतरी विरोध होताना दिसतोय आणि त्याचाच परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.